yuva MAharashtra सूड भावनेने कायद्याचा वापर नको - पोलीस निरीक्षक मोरे यांचे प्रतिपादन !

सूड भावनेने कायद्याचा वापर नको - पोलीस निरीक्षक मोरे यांचे प्रतिपादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
सूड भावनेने माहिती अधिकार कायद्याचा वापर न करता, व्यापक जनहिता करिता करावे. असे आवाहन सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले.

शासन निर्णय नुसार 28 सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्ताने विविध जाणीव जागृती उपक्रम करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार माहिती अधिकार अभियान यांच्यावतीने माहिती अधिकार कायद्याविषयी सांगली शहर पोलीस स्टेशन परिसरात पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी माहिती अधिकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार वक्ते शाहीन शेख होते. यावेळी न्यू लॉ कॉलेज भारती विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सह कुसुम कांबळे, प्रमोद माळी, चंद्रकांत पाटील, महंमद खाटीक, आयुब सुतार, वसंत भोसले ऍड. त्रिशला पाटील, विनोद कदम, चंद्रकांत माळी, रमजान खलिफा, मनीषा कांबळे, रेणुका चव्हाण इत्यादी, विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच एस. टी.महामंडळ विभागीय कार्यालय सांगली येथे माहिती अधिकार दिनानिमित्ताने व्याख्यान संपन्न झाले व इनाम धामणी येथील चौकामध्ये सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेवराव घाडगे यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.