yuva MAharashtra सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांना शतकोत्तर जयंतीनिमित्त जिल्हा बँकेचे अभिवादन !

सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांना शतकोत्तर जयंतीनिमित्त जिल्हा बँकेचे अभिवादन !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ सप्टेंबर २०२४
सहकार तपस्वी, माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बँकेच्या उपाध्यक्ष मा.जयश्रीवहिनी पाटील व संचालक पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्व. गुलाबराव पाटील यांनी १४ वर्षे जिल्हा बँकेचे चेअरमन आणि ३० वर्षे संचालक म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहकार चळवळ मजबूत करुन काँग्रेस पक्ष संघटना भक्कम केली आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जडणघडणीत स्व. गुलाबराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आमदार, खासदार, सहकार क्षेत्रातील द्रष्टा विचारवंत नेता म्हणून गुलाबराव पाटील यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. बँकेने त्यांच्या कार्याची स्मृती जागवून आज त्यांना अभिवादन केले आहे. 


यावेळी संचालक मा. पृथ्वीराजबाबा पाटील, रावसाहेब जि. पाटील, जे. के. बापू जाधव, जयाभाऊ नलावडे, नगरसेवक रज्जाक नाईक, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, विजय घाडगे, रवींद्र वळवडे, किरणभाऊ सूर्यवंशी, पुरुषोत्तम काकडे, सच्चिदानंद कदम, भारतीताई भगत, कविता बोंद्रे, सागर घोडके, आप्पासाहेब पाटील, सचिन जगदाळे, अण्णासाहेब उपाध्ये, प्रा. एन. डी. बिरनाळे अशोक मालवणकर, शेरूभाई सौदागर, मौला वंटमुरे, नाना घोरपडे, शाहीनभाई शेख, अशोकसिंग राजपूत, अजित ढोले, महावीर पाटील, अशोक रासकर, प्रतीक्षा काळे, उत्तम आबा कांबळे, महालिंग हेगडे, नंदाताई कोलप, राजेंद्र कांबळे, आनंद पाटील, अरुण गवंडी, रघुनाथ नार्वेकर, विशाल सरगर, मनोज लांडगे, सनी धोतरे, प्रशांत देशमुख, अजय देशमुख, सिकंदर मुल्ला, श्रीकृष्ण कोकरे, आशिष चौधरी, सुनील मोहिते, सागर मुळे, रामभाऊ पाटील, साजिद अत्तार, सुभाष यादव, संतोष भोसले, विजय कांबळे, उत्तम सूर्यवंशी, अजिजभाई मेस्त्री, अमोल कदम, विशाल हिप्परकर, अजय माने, सुभाष तोडकर, यशवंत माळी, एन. एम. हुल्याळकर, बाळासाहेब पाटील, राजीव लाले, विनायक शिंदे, प्रकाश बरडोले, डी.पी बनसोडे, महेश पाटील, मारुती नवलाई, विक्रम देसाई, समीर मुजावर, प्रशांत आवळे, अनिस मुजावर, प्रथमेश पाटील, अल्ताफ पेंढारी, आयुब निशानदार, लालूभाई मेस्त्री, युसुफ जमादार, ताजुद्दीन शेख, संकेत पाटील, संजय काळोखे, शंकर माने, अभिजीत परीट, प्रतीक्षा काळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ताटे साहेब व शिवाजीराव पाटील, सर्व अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.