yuva MAharashtra नव्या युनिक आयडीमुळे शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख, होणार असा फायदा !

नव्या युनिक आयडीमुळे शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख, होणार असा फायदा !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १० सप्टेंबर २०२४
शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडून मदत दिली जाते. मात्र ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागते. विविध कागदपत्रांची जुळणी करत असताना अनेक शासकीय कार्यालयात व बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. यासाठी केवळ वेळच नव्हे तर पैसाही खर्च होतो, त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत असते. 

याची दखल घेऊन केंद्र शासनाने शेतकऱ्यांना नवीन ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला असून आधार कार्ड प्रमाणेच यासाठी युनिक आयडी नंबर देण्यात येणार आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार असून किमान आधारभूत किंमत ही सुद्धा उपलब्ध होणार आहे.


ही ओळखपत्र देण्यासाठी देशभरात शिबिरे आयोजित केली जाणार असून कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी नुकतीच ही माहिती दिली. या कार्डच्या नोंदणीसाठी लवकरच मार्गदर्शक तत्वे ही जाहीर करण्यात येणार आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या केव्हा दुसऱ्या आठवड्यात यावर प्रत्यक्ष काम सुरू होईल असे देखील चतुर्वेदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.