Sangli Samachar

The Janshakti News

शरद पवारांचा मनोज जरांगे यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचा निर्णय !


| सांगली समाचार वृत्त |
रत्नागिरी - दि. २४ सप्टेंबर २०२४
गेल्या वर्षा दीड वर्षापासून किंबहुना त्या पूर्वीपासूनच मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावरील आंदोलनात उतरला आहे. ठिकठिकाणी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला इतर समाजातूनही पाठिंबा मिळत असतानाच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला असून मनोज जरांगे यांची मागणी योग्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

रत्नागिरी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या शरद पवार यांनी माध्यमाचे संवाद साधताना, मराठा आरक्षणाला आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. परंतु त्याचबरोबर इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा ही शासनाने गांभीर्याने विचार करावा असे मतही व्यक्त केले आहे. 


मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी आणि धनगर समाज आक्रमक झाला असून, ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. तर धनगर समाजाने आपल्याला स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करून मेंढ्यांसह धनगर समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जाहीर केलेली भूमिका या आंदोलकांसाठी त महत्त्वाची मानली जात आहे.