| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ सप्टेंबर २०२४
बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर कोर्टात खटलाही दाखल झाला होता. दरम्यान काल त्याला रिमांडसाठी घेऊन जात असताना, एन्काऊंटर केला. याबाबत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांसह, कायदे तज्ञांनी शंका व्यक्त केले आहे. आता तर थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलीस व सरकारी वकिलांना फैलावर घेतला आहे.
आपले मत नोंदवताना दोन्ही न्यायमूर्तींनी याबाबत शंका घेताना म्हटला आहे की, पोलिसांनी आरोपीच्या डोक्यात गोळी का झाडली ? आरोपीवर नियंत्रण मिळवताना पोलीस डोक्यात गोळी झाढतात की पायावर ? त्यामुळे हा एन्काऊंटर होतच नाही, असे मा. न्यायाधीशांनी म्हटलेले आहे.
अक्षयच्या मृत्यूनंतर त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी एडिट याचे काय दाखल केले होते त्यावर सवाल करीत मुंबई हायकोर्टाने अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अक्षयच्या वडिलांनीही सरकारवर निशाणा साधत पोलीस जर न्याय करणार असतील तर न्यायव्यवस्थेचे गरजच काय असा सवाल केला आहे. दरम्यान सोशल मीडिया वरूनही अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर वर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पोलीस यंत्रणा व सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे आता यावर न्यायालयात सरकारी वकील काय आणि कशी बाजू मांडतात यावर पुढील निर्णय ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवरायांचा कोसळलेला पुतळा प्रकरण आणि त्या पाठोपाठ झालेले अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर शिंदे सरकारलाही जड जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत.