| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ सप्टेंबर २०२४
'चष्मा' ही वाढत्या वयाबरोबर मिळालेली एक अत्यावश्यक गोष्ट मानली जाते. परंतु केवळ वयस्करच नव्हे तर अलीकडे लहान मुलांनाही चष्मा लागण्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पहावयास मिळतील. विशेषतः तरुण-तरुणींना चष्मा लावणे आपल्या व्यक्तिमत्वात बाधा आणत असल्याची भावना असते. त्यामुळे अशी बरीच तरुण मंडळी कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असतात.
वाढत्या वयाबरोबर येणारा चष्मा हा अनेकदा प्रिस्बायोपिया हा आजार नैसर्गिक वृद्धत्वामुळे निर्माण होत असतो. ज्यामुळे जवळचे दिसणे कमी होते. विशेषतः वाचताना वृद्धांना त्रास होतो. आता अशा वृद्ध व्यक्तींना मुंबई येथील एंटोड फार्मासिटिकल्सने प्रिस्बायोपिया उपचारासाठी PresVu Eye Drop बनविला आहे. या ड्रॉपची शिफारस यापूर्वी सेंट्रल ड्रस स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या विशेष तज्ञ समितीने केली होती. परंतु हा ड्रॉप प्रत्यक्ष मार्केटमध्ये आणण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कडून अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक होते. या विभागाकडून आता ही मंजुरी मिळाल्यामुळे, प्रिस्बायोपिया उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी मोठी उपलब्ध असणार आहे.
याबाबतची माहिती देत असताना एंटोड फॉर्मासिटिकल्सचे सीईओ निखिल मसूरकर यांनी कंपनीचे हे उत्पादन वृद्धांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारी ऊर्जा ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.