| सांगली समाचार वृत्त |
सोमनाथ - दि. ३० सप्टेंबर २०२४
गुजरात मधील सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या असून मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर सरकारी भूमीवर अवैध उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे प्रशासनाने भुईसपाट केली. या धार्मिक स्थळाची मालकी सध्या वक्फ बोर्डाकडे होती. अवैधरित्या उभारण्यात आलेल्या 50 हून अधिक धार्मिक जमीन दोस्त करण्याची ही देशातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर प्रमाणे सोमनाथ येथेही असाच कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या या अवैध धार्मिक स्थळांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. परंतु संबंधित वक्फ बोर्डाच्या ट्रस्टीनी दुर्लक्ष केले होते. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जमाव एकत्र झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक हजारावर अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
सोमनाथ मंदिरापासून उभारण्यात आलेली ही अवैध धार्मिक स्थळे हटवण्याबाबत हिंदू धर्मियांकडून गेली अनेक वर्ष मागणी होत होती. या नियोजित सोमनाथ कॉरिडॉरमध्ये निमित्ताने ही अवैध धार्मिक स्थळे हटवल्याने हिंदू धर्मीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गुजरात प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष नुसरत पंजा यांनी मात्र या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून पाडण्यात आलेल्या बांधकामाला 700 ते 800 वर्षाचा इतिहास असो जुन्याकडच्या नवाबाच्या कार्यक्रम या बांधकामांना विशेष संरक्षण होते. मात्र सरकार व जिल्हाधिकारी यांनी न्यायालयाच्या वास्तू काढण्याच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून कारवाई केल्याचे नुसरत पंजा यांनी म्हटले आहे.