Sangli Samachar

The Janshakti News

तिरुपतीनंतर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील लाडू चर्चेत, प्रसादाच्या क्रेटमध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ सप्टेंबर २०२४
तिरुपती येथील मंदिरातील भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडूमध्ये चरबी मिश्रित तेलाचा वापर केल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर जगभरातील भाविकांमध्ये खळबळ माजली. हा वाद क्षमतो न क्षमतो तोच मुंबई येथील ऐतिहासिक सिद्धिविनायक मंदिरातील भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडू ठेवण्यात येणाऱ्या क्रिएटमध्ये उंदीर आणि फुटलेले पॅकिंग आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. 

मुंबई येथील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर संपूर्ण राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान. नवसाला पावणाऱ्या या सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून, किंबहुना जगभरातून भाविक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. यावेळी भाविकांना मंदिरातर्फे प्रसाद देण्यात येतो. याच लाडवाच्या क्रेटमध्ये उंदीर आणि उंदराने फोडलेले लाडवाचे पॅकेट असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राज्यभरातील श्री गणेश भक्तातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सिद्धिविनायक प्रसादाच्या पाकिटावर उंदीर फिरत असून लाडूच्या क्रेटमध्ये काही उंदराची पिल्ले देखील दिसत आहेत. त्यामुळे अशा रीतीने भाविकांच्या भाविकांच्या आरोग्याशी खेळ होतो आहे का ? असा सवाल भाविकातून विचारला जात आहे. मात्र मंदिर प्रशासनाने याचा इन्कार केला आहे. हा व्हिडिओ मंदिर परिसरातील नसून सिद्धिविनायक मंदिराला बदनाम करण्याचे कटकारस्थान असल्याचा आरोप मंदिराचे प्रशासनाधिकारी सर्वांकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान सिद्धिविनायक प्रसाव्याच्या टोपलीत मंदिर आढळल्याच्या प्रकरणाचे सखोल चौकशी होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. व्हायरल फोटो आणि व्हिडिओचेही तपासणी होणार असून यामागे काही षडयंत्र आहे का याचाही तपास केला जाईल असे मुनगट्टीवर यांनी म्हटले आहे.