Sangli Samachar

The Janshakti News

वंदे भारत रेल्वेचे सांगली रेल्वे स्टेशनवर जल्लोषी स्वागत, आमदारांसह अनेक नेत्यांनी घेतला प्रवासाचा आनंद !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ सप्टेंबर २०२४
'वंदे मातरम' व 'भारत माता की जय' च्या उद्घोषात वंदे भारत सेमी बुलेट ट्रेन सांगली रेल्वे स्टेशन वरून पुण्या रवाना झाली. भाजपा रेल प्रकोष्ट चे अध्यक्ष कैलासजी वर्मा व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मोदी यांच्या हस्ते काल पुणे सांगली हुबळी व पुणे सांगली कोल्हापूर अशा दोन वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या दोन्ही गाड्यांचे उद्घाटन केले. पुणे-हुबळी आणि पुणे-कोल्हापूर या दोन्ही गाड्यांना सांगली व मिरज तसेच किर्लोस्करवाडी येथे देण्यात आला आहे.

सांगली रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी पाच वाजता पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजप नेत्या निताताई केळकर, शेखर इनामदार, स्वातीताई शिंदे, गीतांजली धोपे-पाटील, प्रभाकर पाटील व भारतीय निगडे यांच्या हस्ते वंदे भारत गाडी हे सांगली जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी होती.


वंदे भारत रेल्वेचे सांगली स्टेशन मध्ये आगमन होताच, फटाक्यांचे आतषबाजी करण्यात आली. तसेच भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणाने सांगली रेल्वे स्टेशन परिसर दणाणून गेला. यावेळी बँड पथक, लेझीम, व नृत्याचा कार्यक्रमही सादर झाला. 

जपान सारख्या प्रगत देशातील बुलेट ट्रेन धरतीवर नरेंद्र मोदी सरकारने भारतात वंदे भारत सारखी वेगवान रेल्वे सुरू केल्याने प्रवासात आनंदाचे वातावरण आहे. एरव्ही सांगलीहून हुबळी किंवा पुणे येथे जाण्यासाठी एक्सप्रेस गाडीला सहा ते सात तास लागत असतात. परंतु वंदे भारत रेल्वेमुळे प्रवाशांचा दोन तासांचा वेळ वाचणार आहे. त्याचप्रमाणे आरामदायक वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील मोठे व्यापारी केंद्र असलेल्या शहराला चार वंदे भारत रेल्वे गाड्या लाभल्या आहेत. ही सांगलीसाठी अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया उपस्थित आहोत व्यक्त होत होती. या रेल्वेमुळे हुबळी तसेच पुणे येथे जाणाऱ्या व्यापारी वर्गाची मोठी सोय झाली आहे. सांगलीतील अधिकाधिक नागरिकांनीही या वंदे भारत रेल्वेचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगली रेल्वे सल्लागार समितीचे उमेश शहा यांनी केले आहे.