| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ सप्टेंबर २०२४
सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही जिल्ह्यात तो रिमझिम बरसतो आहे. मात्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजाने सांगलीसह अनेक जिल्ह्यांचे टेन्शन वाढवले आहे. त्यांच्या अंगावरनुसार बऱ्याच दिवसांनंतर 21 सप्टेंबर पासून पुन्हा पावसात सुरुवात होणार असून सप्टेंबर अखेरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. 21 सप्टेंबर चे दोन ऑक्टोबर या काळात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पाऊस मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांसह कोकणात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी पंजाबराव उद्योग यांनी सावधगिरीचा इशारा दिला असून, 21 सप्टेंबर पूर्वी हवामान कोरडे असल्यामुळे, उडीद व सोयाबीन पिके काढून घ्यावेत असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात 1, 2, आणि 7 ते 9 तसेच 21 ते 23 या तारखांना पावसाचा जोरदार तडाका बसण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून परतणार असल्याचेही पंजाबराव डख यांनी म्हटले असून यंदा नोव्हेंबरच्या प्रारंभ पासूनच थंडीला सोबत होईल अंदाज हे त्यांनी व्यक्त केला आहे.