yuva MAharashtra स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमास भरीव योगदान, श्रीमती जयश्रीताई पाटील यांचे आश्वासन !

स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमास भरीव योगदान, श्रीमती जयश्रीताई पाटील यांचे आश्वासन !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्राचे माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे जेष्ठ नेते, पलूस-कडेगावचे भाग्यविधाते स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमांमध्ये आम्ही सर्वते योगदान देऊच परंतु जिल्ह्यातील आमचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमास योगदान देतील, असे आश्वासन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी दिले आहे. 

स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण पाच सप्टेंबर 2024 रोजी कडेगाव येथे होणार असून सदर कार्यक्रमासाठी भारतीय संसदीय विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार, उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. विशाल पाटील यांच्यासह अनेक माजी केंद्रीय मंत्री, देश व राज्य पातळीवरील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

कडेगाव येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चांगले विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त कार्यकर्ते व नागरिक सहभागी व्हावेत यासाठी आणि त्यांचे नियोजन करण्यासाठी काल श्रीमती जयश्री ते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.


सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत ॲड. स्वाती प्रमोद सूर्यवंशी यांनी केले, तर प्रास्ताविक माजी नगरसेवक श्री. संतोष पाटील यांनी केले. यावेळी सर्वश्री कय्युम पटवेगार, सचिन कदम, करीम मेस्त्री, ॲड. भाऊसाहेब पवार, रत्नाकर नांगरे यांनी आपले मनोगतात कडेगाव येथील स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम पूर्ण ताकतीने यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. युवा नेते जितेश कदम यांनी कडेगाव च्या कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजनाची सविस्तर माहिती दिली. 

या नियोजन बैठकीस युवा नेते जितेश कदम, माजी महापौर किशोर शहा, आसिफ बावा, उदय पवार, अशोक मोहिते, रघुनाथराव पाटील, दिलीपराव पाटील तसेच सांगली महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य व बूथ कमिटीचे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.