yuva MAharashtra विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्रात दाखल !

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्रात दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. 28 सप्टेंबर पर्यंत हे पथक राज्यात मुक्काम ठोकणार असून या दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी ते राज्यातील पोलीस अधिकारी व सनदी अधिकाऱ्यांसमवेत बैठकही घेणार आहेत.

असा असेल अधिकाऱ्यांचा दौरा

27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेणार. 
दुपारी 1 वाजता सीईओ, नोडल अधिकारी सोबत बैठक घेणार. 
दुपारी 3 वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, इन्कम टॅक्स विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकारीसोबत बैठक घेणार आहे.
सांयकाळी 5 वाजता मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिका-यांशी कायदा आणि सुव्यवस्थेवर बैठक होणार आहे. 
- 28 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक घेणार आहे.
दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेणार आहे.
निवडणूक आधिकारी रात्री उशिरा मुंबईहून दिल्लीकडे रवाना होतील. 


निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच राज्यातील सर्व यंत्रणा खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागतील. दरम्यान निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आपला अहवाल सादर करतील. त्यानंतरच साधारणपणे ऑक्टोंबर च्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.