yuva MAharashtra महाराष्ट्राचे राज्यपाल मा. पी. सी. राधाकृष्णन यांनी दिले जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आदेश !

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. पी. सी. राधाकृष्णन यांनी दिले जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आदेश !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ सप्टेंबर २०२४
सांगली जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करून त्या दृष्टीने आराखडा तयार करण्याची सूचना मिरजेतील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रशासनाला दिली आहे. यावेळी पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपवनसंरक्षक निता कट्टे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर आधी सह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्ण म्हणाले की सांगली जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात वैभवशाली परंपरा व गौरवशाली इतिहास आहे. ती वाढवण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधाकरिता नियोजनबद्ध प्रयत्न आता आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळविणे सोपे होईल, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, भौतिक  विकासाबरोबरच जनतेच्या आर्थिक विकासालाही चालना देण्याचे गरज आहे. या दृष्टीने योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी केली. यावेळी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचा प्रकल्पांचा आढावाही त्यांनी घेतला.


सुरुवातीस राज्यपालांना पोलीस पथकांने मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत वादन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी, मिरजेची ओळख असलेल्या तंतुवाद्याची प्रतिकृती राज्यपालांना भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वा मराठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले.

यानंतर जिल्हाधिकारी डॉ. यांनी जिल्ह्याची लोकसंख्या, जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पर्जन्यमान, साक्षरता दर, ग्राम विकास, नागरी विकास यांचे सादरीकरण केले.