Sangli Samachar

The Janshakti News

जगातील एकमेव बाळ, ज्याने दोनदा मातीच्या गर्भातून घेतला जन्म; पण हा चमत्कार झाला तो का व कसा ?


| सांगली समाचार वृत्त |
केंट - दि. १६ सप्टेंबर २०२४
कधीकधी अशा काही गोष्टी कानावर पडतात की त्याविचार करायला भाग पाडतात. काही गोष्टींवर तर विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण कधीकधी अशा गोष्टी खरोखर घडत असतात. ज्याला लोक चमत्कार असं नाव देतात. अशीच एक बातमी सध्या समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. नऊ महिने आई आपल्या बाळाला गर्भात वाढवते. बाळाची प्रत्येक हालचाल आईला जाणवत असते. त्याचं फिरणं, त्याचं लाथ मारणं आईला जाणवतं. आई हे सगळं सहन करत आपल्या बाळाला जन्म देते. आपल्या बाळाला आई पोटात देखील सुरक्षित ठेवते आणि जन्मानंतर देखील त्याची काळजी तितक्याच प्रेमानं घेते.

नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ जन्माला येतं. बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नाळ कापून डॉक्टर त्याला आईपासून वेगळं करतात आणि गर्भातून बाहेर काढतात. पण तुम्हाला माहितीय का, की एका बाळाने दोनदा जन्म घेतला ही गोष्ट ऐकायला थोडी वेगळी आणि विचित्र वाटेल आणि एकाच बाळाने दोनदा जन्म घेणं कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण हे खरं आहे.


नक्की हे प्रकरण काय?

दोनदा जन्माला आलेले हे जगातील एकमेव बाळ आहे. आईच्या गर्भातून हे बाळ बाहेर काढण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा हे बाळ आईच्या गर्भात टाकण्यात आले. यामुळे या महिलने दोनचा प्रसुतीचा अनुभव घेतला आहे. लिसा कॉफी असे या महिलेचं नाव आहे जिने एका बाळाला दोनदा जन्म दिला. लिसा UK मधील केंटची रहिवासी आहे. लिसाने मातृत्वाचा अत्यंत विलक्षण अनुभव घेतला आहे. सहाव्या आणि नवव्या महिन्यात असं दोनचा लिसाच्या बाळाने जन्म घेतला.

सहाव्या महिन्यात लिसाचे बाळ ऑपरेशनच्या सह्याने गर्भाशयातून बाहेर काढण्यात आले. परंतु पुन्हा तिच्या बाळाला गर्भाशयात टाकण्यात आले. यानंतर नऊ महिन्यानंतर पुन्हा लिसाची नॉर्मल प्रसुती झाली. लिसाने गोंडस मुलीला जन्म दिला. लिसाच्या मुलीचे नाव लुका असे ठेवले आहे.

लुका दोनदा जन्मलेलं जगातील एकमेव बाळ आहे. लुकाचा जन्म हा वैद्यकीय चमत्कारच म्हणावा लागेल. आईच्या गर्भात असतानाच लुकाला स्पिना बिफिडा हा दुर्मिळ आजार झाला होता. या आजारामुळे आईच्या गर्भातच लुकाच्या पाठीच्या कण्याला संसर्ग झाला होता. अशा स्थितीत हा गर्भ वाढला असता तर संसर्ग आणखी वाढून धोका निर्माण झाला असता. याच कारणामुळे 27 आठवड्यात भ्रुण गर्भाशयातून बाहेर काढण्यात आले आणि शस्त्रक्रिया करुन भ्रुण पुन्हा गर्भाशयात टाकण्यात आले. यानंतर गर्भाची वाढ पूर्ण झाल्यावर नऊ महिन्यांनी लिसाची प्रसुती करण्यात आली. जन्मानंतरही लुकाला नवजात अतिदक्षता विभागमध्ये ठेवण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला घरी सोडण्यात आले.