yuva MAharashtra वीराचार्य पत संस्थेच्या चेअरमन पदी श्री. अजितकुमार भंडे तर व्हा. चेअरमनपदी श्री. अरुण पाटील यांची निवड !

वीराचार्य पत संस्थेच्या चेअरमन पदी श्री. अजितकुमार भंडे तर व्हा. चेअरमनपदी श्री. अरुण पाटील यांची निवड !


चेअरमन - अजितकुमार भंडे
व्हा. चेअरमन  - अरुण पाटील

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० सप्टेंबर २०२४
येथील प्रथितयश वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पत संस्था मर्यादित सांगली या संस्थेच्या चेअरमन पदी श्री. अजितकुमार आण्णासो भंडे रा. मालगांव व व्हा. चेअरमनपदी श्री. अरूण आण्णा पाटील रा. नांद्रे यांची नुकताच झालेल्या संचालक मंडळ मिटींगमध्ये एकमताने निवड झाली. संचालक मंडळाची मिटींग मा. अश्विनी नदाफ, अध्यासी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बोलाविणेत आली होती. यावेळी पुढील कालावधीकरीता चेअरमन व व्हा. चेअरमन यांची निवड करणेत आली. संस्थेचे मावळते चेअरमन श्री. एन. जे. पाटील व मावळते व्हा. चेअरमन श्री. मनोज मिलवडे यांनी वरीलप्रमाणे नांवे सुचविली त्यास सर्व संचालकांनी अनुमोदन देवून बिनविरोध निवड पार पडलेचे मा. अश्विनी नदाफ यांनी जाहीर केले. 


यावेळी नदाफ यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणेत आला. नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव श्री. शशिकांत राजोबा यांच्यासह सर्व संचालकांच्या सहकार्याने संस्थेस अधिकाअधिक ग्राहकाभिमुख करून अर्थ सेवेबरोबरच समाजसेवेसाठी प्रयत्न करणार असलेचे सांगितले. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव मा. श्री. शशिकांत राजोबा यांनी पतसंस्थासमोरील आव्हाने, अडचणी यांचा उल्लेख करून संस्था अत्यंत सुयोग्य नियोजनाने प्रगती करीत आहे. त्यासाठी सभासद, ग्राहकांचे चांगले सहकार्य लाभत आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यवस्थापक श्री. शितल मसुटगे यांनी करून सभा सानंद संपन्न झाली.