| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ सप्टेंबर २०२४
नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे 24 निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये कुणबीच्या तीन कोण जातीचा इतर मागास प्रवर्गात समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याबरोबरच ब्राह्मण आणि राजपूत समाजाच्या विकासासाठी नव्या महामंडळाला कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे समाजाची मागणी मान्य झाली आहे.
गेली अनेक वर्ष ब्राह्मण समाजाकडून विद्यार्थ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी परसराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करण्यात येत होती त्याचसाठी अनेक ठिकाणी आंदोलने ही झाली आहेत अखेर विधानसभा निवडणुकीची पूर्वीच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला हे कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून जवळपास दररोज कोणत्या ना कोणत्या योजना सादर केल्या जात आहेत. यापैकी लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय झाली असून महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. या पाठोपाठ लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, वयोश्री योजना अशा अनेक लोकप्रिय योजना महाराष्ट्र सरकारने सादर केले आहेत.
दरम्यान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्यामुळे, ब्राह्मण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून ब्राह्मण समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.