| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० सप्टेंबर २०२४
सध्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग जोरदार तयारी करीत असून 26 नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून एकाच ठिकाणी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या किंवा मूळ जिल्ह्यात निवडणूक कामाशी संबंधित पदावर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी आजची डेडलाईन देण्यात आली आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या कोणत्याही नियमाला बगल दिली जाणार नाही अथवा कोणताही अपवाद करता येणार नाही. तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या किंवा निवडणूक प्रक्रियेशी संलग्न असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आजच करण्याची सूचना दिली आहे.
अद्याप संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याबद्दल मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांचा अहवाल आपल्याला प्राप्त झालेला नाही. विद्यमान विधानसभेचे मुदत 26 नोव्हेंबरला पूर्ण होत असेल तर पूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडले जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व व आयुक्त ग्यानेश कुमार यांनी राज्यातील राजकीय पक्ष, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक तसेच विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक अधिकारी यांच्या बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. तीन वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांमुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या तात्काळ बदलीबाबत आयुक्त ॲक्शन मोडवर आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मात्र नाराजी दिसून येत आहेत.