| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ सप्टेंबर २०२४
मध्यंतरी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात जो चित्रपट क्रीडाप्रेमींच्या कौतुकास पात्र ठरला, त्या 'चंदू चॅम्पियन' चे 'ओरिजनल हिरो' मुरलीकांत पेटकर हे काल सांगलीत आले होते, काँग्रेस नेत्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या कुटुंबीयांतर्फे ह्रद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्रीमती पाटील म्हणाल्या की, मुरलीकांत पेटकर हे केवळ सांगली जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. आपली सारी कारकीर्दच नव्या पिढीसाठी प्रचंड प्रेरणादायक आहे. यावरून अनेक नवे खेळाडू घडतील यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी भावना श्रीमती जयश्रीताई यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना पेटकर यांनी यावेळी आपल्या कारकिर्दीतील अनेक रोमहर्षक प्रसंग कथन केले. त्यामुळे येथे उपस्थित असलेले सारेच भारावून गेले. शालेय जीवनात कुस्ती, हॉकी, आणि मैदानी खेळात चमक दाखवून यांनी आपली खेळाविषयी चे प्रेम निदर्शनास आणले होते. पुणे येथे भारतीय सैन्य दलातील टोकडीत प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट खेळाडू असे स्वतःचे ओळख निर्माण केली. प्रत्येक खेळात त्यांनी प्राविण्य मिळवले होते. मात्र हा सारा प्रवास खडतर आणि आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
1964 साली जपान मधील टोकियो येथे झालेल्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये भारतीय सैन्य दलात तर्फे मुष्टीयुद्ध या खेळाचे प्रतिनिधित्व करण्याचे संधी प्राप्त झाली होती. 1965 च्या पाकिस्तानी विरोधी युद्धात गंभीर रित्या जखमी झाल्याचे सांगून हा अनुभव शिक्षक असल्याचे ते म्हणाले. सैन्य दलातील आणि क्रीडा विश्वातील यांना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवून भारताला पेटकर यांनी बहुमान प्राप्त करून दिला असून इंग्लंड येथे झालेल्या स्टोक मंडेविले आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजिक स्पर्धेमध्ये स्वतःचाच विक्रम त्यांनी मोडला. सलग पाच वर्षे सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवण्याचे सातत्य त्यांनी ठेवले होते. स्कॉटलंड मधील एडिनबरा येथे झालेल्या तिसऱ्या कॉमनवेल्थ पॅराप्लेजिक स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्रीस्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक, भालाफेकीत रोग्य तर गोळा फेक येत कांस्यपदक मिळवले होते त्याचप्रमाणे 1982 हॉंगकॉंग येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी 50m जलतरण स्पर्धेत नवा विश्वविक्रम स्थापित केला होता.
मुरलीकांत पेटकर यांच्या सत्कार प्रसंगी डॉ. जितेश कदम, संग्राम पाटील, सोनिया होळकर, पानपट्टी असोसिएशनचे अजित सूर्यवंशी, अमित लाळगे, धनु खांडेकर, महेश पाटील यांच्यासह मदन भाऊ पाटील युवा मंचचे कार्यकर्ते व अनेक मान्यवर उपस्थित होते.