yuva MAharashtra हिंदकेसरी पै. यांच्या कवठेपिरान येथील स्मारकाचे कामे पूर्ण करण्याचे पालकमंत्री ना. खाडे यांचे आदेश !

हिंदकेसरी पै. यांच्या कवठेपिरान येथील स्मारकाचे कामे पूर्ण करण्याचे पालकमंत्री ना. खाडे यांचे आदेश !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ सप्टेंबर २०२४
जकार्ता वीर, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्तीचे फड गाजवलेले, सांगलीच्या राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले कवठे पिरांनचे वैभव, हिंदकेसरी स्व. पै. मारुती माने यांचे स्मारक गेले अनेक वर्षे अपूर्ण अवस्थेत आहे. याच प्रश्नावरून त्यांचे पुतणे पै. भीमराव माने यांनी विविध पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश प्राप्त होत असून, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या हिंदकेसरी पै. मारुती माने स्मारक समितीच्या बैठकीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी प्राधान्य क्रमाने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

हिंदकेसरी पै. मारुती माने यांनी केवळ कुस्ती क्षेत्रातच नव्हे तर, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात दमदार कामगिरी केले आहे. याच कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मारकासाठी चार कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, यापैकी चार कोटी नऊ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहेत. सदर निधी मधून मुख्य इमारतीसह प्रवेश गॅलरी, हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांचा पुतळा, म्युझिअम, रेस्टलिंग प्रॅक्टिस हॉल, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते, कुंपण भिंत, प्रवेशद्वार आदि कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.


यावेळी ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी सदर कामाच्या दर्जामध्ये कोणतेही तडजोड केली जाऊ नये अशी सूचना केले त्याचप्रमाणे हिंदकेसरींच्या पुतळ्यामध्ये जात रोटी आहेत त्याही तातडीने दूर कराव्यात असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी स्मारक समिती सदस्याने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश ना. डॉ. खाडे यांनी दिले.

या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, माजी आमदार दिनकर पाटील, निशिकांत पाटील, नामदेवराव मोहिते, विठ्ठल पाटील, भीमराव माने, रघुनाथ दिंडे, वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते.