yuva MAharashtra राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळलेल्यामागचे कारण चौकशी समितीच्या अहवालातून झाले स्पष्ट !

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळलेल्यामागचे कारण चौकशी समितीच्या अहवालातून झाले स्पष्ट !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ सप्टेंबर २०२४
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उद्घाटनानंतर कोसळला आणि संपूर्ण राज्यात शिवप्रेमींचा उद्रेक झाला. या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले. पुतळा उभारणारा कंत्राटदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील असल्याने, त्याच्याबाबत कोणतीही खातरजमा करता, अनुभव लक्षात न घेता कंत्राट दिल्याचा थेट आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केला गेला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे व शिवप्रेमींची माफी ही मागितली. लवकरच दुसरा दर्जेदार पुतळा उभारण्याचे आश्वासन महाराष्ट्र शासनाकडून दिले गेले. आणि या पुतळा दुर्घटने प्रकरणी चौकशी समितीचे स्थापना ही झाली. आता या चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून पुतळा कोसळण्यामाचे नेमके कारण या समितीने आपल्या अहवालात दिले आहे.


या चौकशी समितीच्या अहवालात चुकीच्या वेल्डिंग कामामुळे पुतळ्याला गंज लागला तसेच कमकुवत प्रेम मुळे पुतळा कोसळला असल्याचा 16 पानी अहवाल या चौकशी समितीने दिला आहे. आता या अहवालाच्या आधारावरच शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे समोर येत आहे.

जयदीप आपटे याला कल्याण मधून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक करण्यात आली होती. फरार असलेला जयदीप आपटे हा आपल्या कुटुंबियांना भेटायला आल्यानंतर कल्याण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. आज त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

दरम्यान मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा 60 फुट उंच दर्जेदार व भक्कम पुतळा उभारला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. याबाबत आणखी एका समितीची स्थापना करण्यात आली असून, नव्याने उभारण्यात येणारा पुतळा कशा स्वरूपाचा असेल यासंदर्भात अभ्यास करणार आहे. गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतळ्याच्या धर्तीवर नव्याने उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा असणार आहे.