yuva MAharashtra दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने मुंबई पोलीस हायअलर्ट, महत्त्वाच्या ठिकाणी करडी नजर !

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने मुंबई पोलीस हायअलर्ट, महत्त्वाच्या ठिकाणी करडी नजर !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ सप्टेंबर २०२४
मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची भीती सेंट्रल एजन्सी कडून मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याचे दिसून आले आहे. काल दिवसभर मुंबई पोलिसांकडून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. धार्मिक स्थळे, सर्व महत्त्वाची रेल्वे स्टेशन्स, आणि गर्दीचे ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त पहावयास मिळाला.

मुंबईला दहशतवाद्याकडून नेहमीच टार्गेट करण्यात येतं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, संपूर्ण जगासाठी ते महत्त्वाचे शहर मानले जाते. भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी अनेक माध्यमातून मुंबईतील महत्त्वाच्या बँका, शेअर बाजार या यंत्रणांवर सायबर हल्ला करण्यात येतो. यावेळी केंद्रीय यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा मेसेज मिळाल्यानंतर मुंबईतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. सर्व धार्मिक स्थळे, बाजारपेठा, हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली. 

परंतु नागरिकांनी घाबरून न जाता, कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता नेहमीप्रमाणेच आपली जबाबदारी ओळखून शांतता बाळगावी, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.