Sangli Samachar

The Janshakti News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्टर स्ट्रोक, बांगलादेशांकडून एक पाऊल मागे घेत हा निर्णय फिरवला !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २३ सप्टेंबर २०२४
भारताचे महत्त्व लक्षात घेऊन बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला होता. दोन्ही देशा दरम्यान व्यावसायिक आदान प्रदान होत होते. ज्याचा फायदा भारतापेक्षा बांगला देशालाच अधिक होत होता. परंतु तेथील भारत द्वेषी विशेषतः हिंदू द्वेषी विरोधकांनी आंदोलनाच्या माध्यमातून शेख हसीना यांना पदभ्रष्ट करीत बांगलादेशातून हाकलून लावले. त्यांच्या जागी नेहमीच भारताला विरोध करणाऱ्या मोहम्मद युनूस यांचे नियुक्ती केली होती. 

बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार उलथल्यानंतर तेथे मोठा हिंसाचार होऊन हिंदूंची मारहाण झाली होती. काहींची हत्या झाली होती. त्यामुळे अनेक हिंदूंना आपल्या संपत्तीवर पाणी सोडून परागंदा व्हावे लागले होते. पंतप्रधान मोहम्मद युनूस हे सातत्याने भारत विरोधी भूमिका घेत आहेत. नुकतीच त्यांनी भारतातून होणाऱ्या हिल्सा माशाची निर्यात थांबविण्याचा आदेश दिला होता. यामुळे कोळी बांधवांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांना एक झटका दिल्यानंतर ते वठणीवर आले आहेत. 


मोहम्मद युनुस यांच्या भारत द्वेषामुळे संयुक्त राष्ट्र बैठकीच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट टाळली आहे. मात्र परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री तोहीद हुसेन यांची भेट घेणार असून द्विपक्षीय संबंध सुधारणा बाबत चर्चा करणार आहेत. यानिमित्ताने भारता शेजारील गमावलेला एक मित्र पुन्हा कमावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न होणार आहेत. सध्या चीन भारता शेजारील मित्रांना तोडण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहे. जयशंकर यांची मुत्सद्देगिरी यशस्वी झाली, तर श्रीलंके पाठोपाठ आणखी एक मित्र भारताला परत मिळणार आहे. त्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.