| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १० सप्टेंबर २०२४
मिरज येथील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या प्रमिलादेवी पाटील फिजिओथेरपी काॅलेजमध्ये २ सप्टेंबर २०२४ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'वर्ल्ड फिजियोथेरपी सप्ताह' उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहात, सांगलीत विविध उपक्रम आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. ज्यामध्ये फिजियोथेरपीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
उत्सवाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये फिजियोथेरपी संबंधित प्रात्यक्षिके, व्याख्याने, राममंदिर ते विश्रामबागपर्यंत पथसंचलन आणि जनजागृती पथनाट्य, कुपवाड वृध्दाश्रमात फिजिओथेरपी उपचार व फळे वाटप आणि बुधगाव येथे मोफत उपचार व सल्ला शिबीर इ. समाविष्ट होते.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'फिजिओथेरपी म्हणजे एखाद्या दुखापतीला किंवा आजारामुळं हालचाल न करू शकणाऱ्या लोकांच्या सांध्याची समस्या दूर करुन स्नायू मोकळे करण्यास मदत करणारी उपचार पध्दती होय. अपघात, दुखापत किंवा शारीरिक हालचाल मंदावलेल्या लोकांना औषध पूर्णपणे बरं करू शकत नाहीत, त्यासाठी फिजिओथेरपी ही सहाय्यक उपचारपद्धत म्हणून उपयोगी पडते. रुग्णांना दिलासा देणारा उपक्रम घेतल्याबद्दल मी प्राचार्य, विद्यार्थी व स्टाफचे अभिनंदन करतो.
कॉलेजच्या प्राचार्यां डॉ आकांक्षा जोशी यांनी या प्रसंगी फिजियोथेरपीच्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल आणि समाजावर होणाऱ्या प्रभावाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालच्या प्राचार्या आकांक्षा जोशी, संपूर्ण स्टाफ, विद्यार्थी व संस्थापक चेअरमन मा. श्री पृथ्वीराजबाबा गुलाबराव पाटील, विश्वस्त मा. वीरेंद्रसिंह पाटील, समन्वयक डॉ. सतीश पाटील सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. वर्ल्ड फिजियोथेरपी डे' चा उत्सव उत्साहात साजरा करताना, समाजात फिजियोथेरपीच्या उपचार पध्दतीचा रुग्णांना चांगला लाभ होईल आणि सहज सुलभ पद्धतीने उपचारासाठी रुग्ण फिजिओथेरपीकडे वळेल अशी अपेक्षा असल्याचे प्राचार्य आकांक्षा जोशी यांनी सांगितले.