Sangli Samachar

The Janshakti News

लाडकी बहीण योजनेसाठी अजून अर्ज केला नाही ? मग लगेच करा, तुम्हालाही मिळतील साडेचार हजार रुपये, अधिक माहितीसाठी वाचा...


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ सप्टेंबर २०२४
सध्या महाराष्ट्रातील भगिनी वर्गावर पसरलेले 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने'चे गारुड दिसून येत आहे. सुरुवातीला योजना जाहीर झाल्यानंतर ऑफलाइन की ऑनलाईन हा गोंधळ झाला. योजनेतील अनेक त्रुटी समोर आल्या. अशीच एक महिलांना अर्ज करणे अवघड गेले. ज्याने मध्ये त्यांच्यामार्फत अर्ज दाखल केले, त्यांच्या खात्यावर आतापर्यंत साडेचार हजार रुपये जमा झाले. 

पार्श्वभूमीवर 'कुठले मिळतात पंधराशे रुपये ?' असे म्हणणाऱ्या भगिनींनी, ही तर भगिनींच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर, योजनेसाठी अर्ज दाखल करण्याकरिता धावपळ सुरू केली. परंतु यातच ऑगस्ट महिना हे संपला. अजूनही अनेक महिलांनी अर्ज दाखल केला नसला तरी, अशा महिलांकरिता सप्टेंबर महिना आतील पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, या सर्वांच्याच पात्र महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी अद्यापही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी खालील प्रमाणे, घरी बसूनही अर्ज दाखल करता येऊ शकतो यासाठी खालील माहिती महत्त्वाची आहे...


ladkibahin.maharashtra.go.in या पेजला भेट द्यायची आहे. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, 1 कोटींहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या पोर्टलवर 84 लाखांहून अधिक अर्ज मंजूर झालेले आहेत. 

अर्ज कसा करायचा?

अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं. नवीन असल्यास खाते तयार करा, या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत टाईप करा. मोबाईलचा नंबर टाकून पासवर्ड सेट करा. जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर क्लिक करा. नसेल तर लागू नाही, यावर क्लिक करा. ऑथोराईज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशनुसार विकल्प निवडा. टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून ॲक्सेप्ट करा. माहिती भरा आणि साईन अपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं साईन इन यशस्वी होईल. त्यानंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करा. अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

आधारकार्ड नंबर टाकून माहिती भरा आणि व्हॅलिडवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल. हास हा संपूर्ण इंग्रजीत टाईप करायचा आहे. अर्ज भरून झाल्यानंतर ओके या बटणावर क्लिक करा आणि कागदपत्र अपलोड करा. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधारकार्डप्रमाणे नमूद करा. पिनकोड भरा. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/नगरपालिका सिलेक्ट करा. जो मतदारसंघ असेल, तो सिलेक्ट करा. तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक भरा.

या नंबरवर तुम्हाला अर्जाबाबत मेसेज येतील. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आधारकार्डवर ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाता क्रमांक भरा. बँकेची इतर माहिती भरा. आयएफएससी कोड भरा. बँक खाते आधारकार्डशी लिंक असेल, तर होयवर क्लिक करा. जर आधारकार्डसोबत बँक खाते जोडलं गेलं नसेल, तर ते लिंक करून घ्या. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी. आधारकार्डच्या समोरील बाजू पहिल्या पर्यायात अपलोड करा. दुसऱ्या पर्यायात आधारकार्डची मागील बाजू अपलोड करा. आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला याबाबत एसएमएस द्वारा माहिती कळविली जाईल.