yuva MAharashtra ठाकरे गट 'मुस्लिम कार्ड' खेळण्याच्या तयारीत, आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार देण्याबाबत विचार; सर्वत्र उलट सुलट चर्चा !

ठाकरे गट 'मुस्लिम कार्ड' खेळण्याच्या तयारीत, आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार देण्याबाबत विचार; सर्वत्र उलट सुलट चर्चा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ सप्टेंबर २०२४
मुस्लिम समाज अल्पसंख्यांक असला तरी त्याचा टक्का विजयासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो, हे ओळखून काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर मुस्लिम समाजाला अनेक महत्त्वाच्या पदावर संधी दिली होती. याचा फायदाही काँग्रेसला आजपर्यंत झाला आहे. परंतु गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच नव्हे तर, राष्ट्रवादीनेही मुस्लिम उमेदवार देण्यात हात आखडता घेतला होता. परिणामी महाआघाडीच्या मतांमध्ये घट झाल्याचे पहावयास मिळाले.

परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा आपल्यात घेण्याची पावले टाकत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अगदी ठाकरे गटही आपल्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेशी तडजोड करताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबरनाथ दानवे यांनी, 'आम्हाला मुस्लिमांचं वावडं नाही, मेरिटच्या आधारे आम्ही मुस्लिम आला आहे उमेदवारी देऊ' असं विधान केल्याने सर्वांच्या भवया उंचावल्या आहेत.


आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना अंबादास दानवे म्हणाले की, येणाऱ्या काळात महाआघाडीत मुस्लिमाला चांगले प्रतिनिधित्व देण्याचा विचार सुरू आहे. इतकेच नव्हे तर शिवसेना हे मुस्लिम उमेदवार देऊ शकते. शिवसेनेत आजपर्यंत कधीही जाती-धर्माच्या आधारे उमेदवारी दिली जात नाही तर ती मेरिटच्या आधारे दिली जाते. त्यामुळे एखादा मुस्लिम या तत्त्वावर बसला तर त्यालाही उमेदवारी मिळू शकते. इतकंच काय तर इतर समाजातील इच्छुकांचीही शिवसेना उमेदवारी बाबत विचार करू शकते.

अंबादास दानवे यांच्या भूमिकेवर एमआयएम चे नेते माजी आमदार इम्तियाज झाले यांनी म्हटले आहे की, महाआघाडी मुस्लिम उमेदवारीबाबत विचार करीत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु आपल्याला मुस्लिम मते हवे असतील, तर फक्त उमेदवारी देऊन चालणार नाही. तर त्यांच्या विजयाची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रतिक्रियांना म्हटले आहे की, ही लोकशाही आहे, इथे हिंदू, मुस्लिम, दलित असा भेदभाव करता येणार नाही. शिवसेनेचे मुस्लिम उमेदवारी देण्याचे तयार असेल तर मला त्यात काही वावगं वाटत नाही.

मात्र शिवसेना संजय गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी मात्र अंबादास दानवे यांच्या या नव्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचा कल फुकटचे मते कशी मिळतील याकडे आहे त्यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन सुरू केले आहे. मोदी विरोधातला निर्माण करायची, मिरवणुकीत पाकिस्तानची झेंडे मिळवायचे, ही या लोकांची हिंदुत्वाची भूमिका घातक आहे. ना हिंदूंशी प्रामाणिक राहिले ना मुस्लिमांशी. त्यामुळेच मुस्लिम समाज ठाकरे यांच्यापासून दुरावत चालला आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.