| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. ३० सप्टेंबर २०२४
आ. सदाभाऊ खोत हे आपल्या बेधडक वक्तव्याने सर्व दूर परिचित आहेत. त्यांच्या वक्तव्याने ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. नुकतेच त्याने जत तालुक्यातील असेच एक खळबळजनक फक्त हे केले आहे. "जर हे महायुतीचे सरकार गेलं तर येणारे महाआघाडीचे सरकार लाडकी बहिणी योजना बंद करणार, त्यामुळे लाडकी बहीण नाराज होऊन दुसऱ्याला मत देणाऱ्याची बायको नाराज होऊन घटस्फोट पण घेईल. त्यामुळे याचा बसतात नवरोबांना होणार आणि यासाठी मला आंदोलन करण्यासाठी पुन्हा या तालुक्यात यावं लागणार" असं म्हटले आहे.
सध्या आ. सदाभाऊ खोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी जत तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार रुपये केले आहेत. तसेच लाडक्या बहिणीला दर महिना पंधराशे रुपये देत आहे.
यावेळी आ. सदाभाऊ खोत यांनी बुलेट वरून फेरफटका मारला व गावकऱ्यांशी संवाद हे साधला. येथील खंडनाळ मंदिराच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी आ. गोपीचंद पडळकर हे महायुतीचे उमेदवार असते असे जाहीरही करून टाकले. आ. गोपीचंद पडळकर व मी तालुक्याच्या विकासासाठी हवा तितका निधी देऊ असेही म्हटले आहे.