| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दी मध्ये असणारे मनपा शाळांमध्ये एक पेड मॉ के नाम अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकां मार्फत झाले लावण्यात आले आहे. यावेळी स्वच्छता ही सेवा आणि माझी वसुंधरा बाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी शपथ घेण्यात आली आहे.
यावेळी २७ शाळां मध्ये ७०० विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सहभाग घेतला आहे, साधारणपणे 300 च्या वर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उप आयुक्त वैभव साबळे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे, शहर समनव्यक वर्षाराणी चव्हाण यांनी नियोजन केले होते.