Sangli Samachar

The Janshakti News

पावणेदोनशे वर्षांची परंपरा असलेल्या सांगलीच्या चोर गणपतीचे उत्साही वातावरणात आगमन, भाविकांचे मंदिरात दर्शनासाठी गर्दी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ सप्टेंबर २०२४
सांगलीकरांचा आराध्य असलेला श्री गणपती शनिवारी घराघरात प्रतिष्ठापित होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'श्रींचे' आगमन दिमाखात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पावणे दोनशे वर्षाचे परंपरा असलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा भाग असलेल्या चोर गणपतीचे बुधवारी आगमन झाले. विधीवेद पूजा केल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. कागदापासून बनवलेल्या या पर्यावरणपूरक गणपतीचे अत्यंत गुपचूप मंदिरात आगमन होते, यामुळेच या गणपतीला चोर गणपती म्हणण्याची प्रथा सुरू झाली. मुख्य गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला या गणपतीचे प्रतिष्ठापना होत असते. यंदाही सांगलीच्या सुप्रसिद्ध गणेश मंदिरातील गाभाऱ्यात या मूर्तीची भावपूर्ण वातावरणात प्रतिष्ठांपना करण्यात आली.


चोर गणपती म्हणून प्रसिद्ध असलेली पावणे दोनशे वर्षापासूनची कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आलेले ही श्रींची मूर्ती इतकी राखीव रेखीव आहे की, ते कागदाच्या लागद्यापासून बनवलेली आहे हे लक्षातही येत नाही. बुधवारी प्रतिष्ठापित करण्यात आलेले श्रींची मूर्ती नव्याने रंगविण्यात आल्याने ती अधिकच आकर्षक दिसत आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीची ओळख असलेले श्री गणपती मंदिर अत्यंत आकर्षकरित्या सजविण्यात आलेले असून नेहमीप्रमाणेच ते गणेश भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहे. मध्यंतरीचा कोरोना काळ आणि महापूर यामुळे या परंपरेत काहीसा खंड पडला होता. परंतु 2023 पासून ही परंपरा पुन्हा सुरू झाली असून, गणेश भक्तांसाठी ती पर्वणीच असते. सांगली शहरासह परिसरातील भाविक सांगलीच्या श्री गणपती मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी मोठे गर्दी करीत असतात. यंदाही या गणेशोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिले आहे. 

शहराचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे. या देखाव्यांनाही परंपरा असून, वखार भाग, पेठ भाग या शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना शतकोत्तर परंपरा आहे. त्यामुळे यंदाही या देखाव्यांचे भक्तांना उत्सुकता आहे.