yuva MAharashtra विटा-कोरेगाव मार्गावरील जगदंब हॉटेल मधील बोर्ड वाचलात तर हसल्याशिवाय राहणार नाही !

विटा-कोरेगाव मार्गावरील जगदंब हॉटेल मधील बोर्ड वाचलात तर हसल्याशिवाय राहणार नाही !


| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. २४ सप्टेंबर २०२४
आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी अनेक लोक भन्नाट कल्पना लढवतात. एकीकडे या जाहिरातींसाठी लाखो रुपये खर्च करून मोठमोठ्या कंपन्या वृत्तपत्र, मासिके आणि टीव्हीच्या माध्यमातून कल्पक जाहिराती प्रसिद्ध करत असतात. या जाहिराती पाहिले की खरोखरच त्यांच्या बुद्धिमत्तेला दाद द्यावीशी वाटते.

पण त्याचबरोबर अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या टपरीवरील किंवा ढाब्यावरील छोटाशा बोर्डवर असलेल्या जाहिरातीने मोठी करमणूक होत असते. अर्थात पुण्यातील विविध ठिकाणी असलेल्या जाहिरातीच्या बोर्ड वरील मजकुराची चर्चा नेहमीच होत असते. परंतु विटा कोरेगाव मार्गावरील एका हॉटेल मधील जाहिरात प्रवाशांच्या चर्चेचा विषय बनली आहे.


विटा कोरेगाव मार्गावरील असलेल्या औंध फाट्यावर 'जगदंब' हे छोटेसे हॉटेल. या ठिकाणचे पदार्थ तोंडाला चव आणणारे. विशेषतः मिसळ. आणि याच मिसळची जाहिरात करणारे एक पोस्टर या ठिकाणी असून, ते वाचल्यानंतर चेहऱ्यावर हास्य उमटल्याशिवाय राहत नाही...

"इथे तुम्हाला मेहुणी पेक्षा तिखट आणि बायको पेक्षा झणझणीत मिसळ मिळेल"

" एक मिसळ दोघांमध्ये खाल्ल्याने प्रेम वाढते तसेच 40 रुपये वाढतील"

हे वाक्य हॉटेल मालकांची कल्पकता दर्शवते पण त्याचबरोबर... 
"चांगला चहा पिण्यासाठी मुलगी पाहायला जायची गरज नाही आम्ही आहोत." 
हे वाक्य हे चेहऱ्यावर हास्य उमटवते...

आपण कधी या मार्गावरून प्रवास करणार असाल, तर निश्चित येथे थांबून मिसळची आणि या पोस्टरची नक्की मजा घ्या...