yuva MAharashtra कुरेश कॉन्फरन्सच्या राज्य उपाध्यक्षपदी प्रो. अखलाक ताडे यांची तर पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी असिफ कलाल यांची नियुक्ती !

कुरेश कॉन्फरन्सच्या राज्य उपाध्यक्षपदी प्रो. अखलाक ताडे यांची तर पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी असिफ कलाल यांची नियुक्ती !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ सप्टेंबर २०२४
कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली या मुस्लीम खाटीक बांधवांच्या संघटनेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सांगलीचे प्रोफेसर अखलाक जियाअहमद ताडे यांची तर पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी आटपाडीचे इंजिनियर असिफ निजाम कलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुप्रीम कोर्टातील वकील सनोबर अली कुरेशी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील २८ उच्चशिक्षितांना राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक यांच्या शिफारशीनुसार नियुक्त केले आहे.   

नवी कार्यकारिणी अशी

पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर युसूफ खान - रहिमतपुरे. (कराड), उपाध्यक्ष सर्वश्री अरीफ इसाक खाटीक (कसबे डिग्रज), सुलतान नुरमहंमद खाटीक (किणी, कोल्हापूर) आणि खाजाभाई अब्दुलगफुर कोतींबिरे (सोलापूर). जनरल सेक्रेटरी - आटपाडीचे असिफ (बाबु) रमजान खाटीक उमदीकर तर सेक्रेटरी म्हणून इस्लामपूरचे इम्रान रज्जाक खाटीक यांना नियुक्त करण्यात आले आहे. 

प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारणीवर निमंत्रीत सदस्य म्हणून अन्वर दस्तगीर पालकर (सातारा), माजी मुख्याध्यापक मोहंमद हनिफ नबीसो सय्यद (इचलकरंजी), माजी मुख्याध्यापक असिफ मोहंमदअली बेदरेकर ( मपंढरपूर), डॉ . रियाज अहमद शेख (अहमदनगर), इंजिनियर शब्बीर बाबालाल ताडे (सांगली), लियाकत हाजी खताल मसूरकर (कराड) यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेश सल्लागार आणि पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य म्हणून समीर फकीरमहंमद खाटीक डिग्रजकर (सांगली) , अझर शकीलअहमद (जब्बार) कमलीवाले (पंढरपूर), लतिफ बादशहा कसाई (विटा), सैफ इब्राहीम खाटीक दुधेभावीकर (सांगली) यांना नियुक्त करण्यात आले आहे. 


पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारणी मध्ये सर्वश्री अलताप नब्बु शेख (अहमदनगर), अमजद महंमद कलाल (पेठ किन्हई, सातारा), असिम मुख्तार पटेल (कोंढवा, पुणे), सद्दाम रफीक खाटीक (कुपवाड, सांगली), ॲड . रमिज अख्तरनवाज कलाल (सातारा), मुसा हसन सव्वालाखे (सांगोला सोलापूर), जावेद बादशहा इनामदार (पेठ वडगाव, कोल्हापूर), हामीद बबन खाटीक (इस्लामपूर, सांगली), अमिर अनिस खाटीक (आटपाडी), रियाज हाजी इस्माईल कुरेशी (इस्लामपूर, सांगली) यांचा समावेश करण्यात आला आहे.