| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. ६ सप्टेंबर २०२४
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत, निवडणुकीतील महिलांचा 'टक्का' मतांच्या टक्केवारीवर परिणाम करणार असल्यामुळे, महायुतीप्रमाणेच महाआघाडीही विविध लोकप्रिय योजना राबविण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणजे, राज्यात महाआघाडीचे सत्ता आल्यास महिलांना पंधराशे नव्हे तर दोन हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कडेगाव येथे जाहीर सभेत बोलताना केले.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे एक लाख 70 हजार मतांनी जिंकले असल्याचा डंका भाजपा पिटत आहे. परंतु आमचे विश्वजीत कदम हे एक लाख 40 हजार मतांनी विधानसभेचे रणांगण गाजवले आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. त्यामुळे काँग्रेसला कोणी कमी लेखू नये असे सांगत खर्गे यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराला हात लावला ते गळत आहे, गुजरात मधील पुलाचे उद्घाटन केले, तो कोसळला आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तोही पडला. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कशाचे उद्घाटन होते, आहेत आणि तेथे काय होते याकडे जनता डोळे लावून बसली आहे असेही खर्गे म्हणाले.