| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० सप्टेंबर २०२४
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात 797 दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली मिरजेच्या नदी घाटावर तसेच कृत्रिम विसर्जन कुंडाच्या आवारात सर्व व्यवस्था करण्यात आली होती.
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन कुंडात 150, मिरज कृष्णा घाट 50 आणि सांगली कृष्णा नदीचे सर्व घाट येथे 797 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यावेळेस एकूण 19 गणेश मूर्ती या महापालिकेकडे दान स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत तर साडे पाच टन निर्माल्य संकलित झाले आहे.
दरम्यान, पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून सांगली मिरजेतील सर्व नदी घाट, कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणीं महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नदी घाटावर आपातकालीन व्यवस्था 24 तास तैनात करण्यात आली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडील निर्माल्य हे नदी पात्रात न विसर्जित करता महापालिकेच्या निर्माल्य कुंडामध्ये जमा करावे तसेच जास्तीजास्त मुर्तिदान कराव्यात आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.