yuva MAharashtra सांगलीत लव जिहादच्या माध्यमातून धर्मांतर केलेल्या तरुणीला घेतले पुन्हा हिंदू धर्मात !

सांगलीत लव जिहादच्या माध्यमातून धर्मांतर केलेल्या तरुणीला घेतले पुन्हा हिंदू धर्मात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ सप्टेंबर २०२४
लव जिहादच्या माध्यमातून फसवणूक करून धर्मांतर केलेल्या तरुणीचे मनपरिवर्तन करीत शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतल्याची घटना सांगली शहरात घडली. यासाठी हिंदू एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांनी पुढाकार घेतला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली शहरातील एका शालेय तरुणीला एका धर्मांध तरुणांने लव जिहादच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून निकाह केला होता. ही घटना समजताच, वडिलांनी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर हिंदू एकता आंदोलनांसह इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तातडीने पाऊल उचलत, सदर आई-वडिलांना पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी मुलाच्या मोबाईल वरून टॉवर लोकेशन शोधून दोघांना ताब्यात घेतले.


त्यानंतर सदर तरुणीचे मनपरिवर्तन करीत पुन्हा तिची नोटरी केली व हा निकाह रद्द केला. आणि तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या मोहिमेत हिंदुत्ववादी तरुण विनायक खेत्रे, आशिष साळुंखे, अनुज निकम, अनिरुद्ध कुंभार, अंकुश जाधव, प्रदीप निकम, श्रीनिवास नाझरे, राजू जाधव, मयूर निकम, श्रीधर मिस्त्री आदींनी महत्त्वाची भूमिका निभावली.

यानंतर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी सांगली जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांना तसेच नोटरी अधिवक्त्यांना जाहीर आवाहन केले असून, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हिंदू तरुणींचे धर्मांतर करण्याची नोटरी करू नये. असे प्रकार लक्षात आल्यास त्यांचा नोटरी परवाना रद्द करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा दिला आहे.


अलीकडे लव जिहादच्या माध्यमातून तरुणींची फसवणूक करण्याची घटना वाढली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना सतर्क झाल्या असून, अशा घटना रोखण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पालकांनीही आपल्या मुलींवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता समाजातून व्यक्त होत आहे. यापूर्वी धर्मांतर झालेल्या तरुणींची जी अवस्था झाली आहे, ती चिंताजनक आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींना यापासून रोखण्यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.