| सांगली समाचार वृत्त |
कुपवाड - दि. १५ सप्टेंबर २०२४
कुपवाड मधील जैन समाज हा सरळमार्गी आहे. गेली ४५ वर्षे समाजाने दिगंबर जैन सेवा समितीच्या पुढाकाराने व तिन्ही जिन मंदीर कमिटी, प.पू.सुधर्मसागर प्रतिष्ठान, वीर सेवा दल व वीर महिला मंडळाच्या सहकार्याने वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पर्यूषण पर्व व्याख्यानमालेची परंपरा जीवापाड जपली आहे. या व्याख्यानमालेत आर्जव धर्मावर संवाद साधताना जैन समाजातील तत्त्ववेत्ते प्रा. एन. डी. बिरनाळे बोलत होते.
बिरनाळे यांनी, आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा, साधेपणा, निष्कपटीपणा विषद करताना? दशधर्म, भ. महावीरांची वाणी, प्रथमाचार्य शांतीसागर महाराज व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे योगदान आणि तत्वार्थ सूत्र रचयिता आचार्य उमास्वामी व यांच्या कार्याची महती सांगताना श्रावक श्राविकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी होता. अध्यक्षस्थानी कॅप्टन भालचंद्र पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय ढोले उपस्थित होते. दोघांनीही अत्यंत मुद्देसूद प्रभावी मार्गदर्शन केले.
यावेळी मलगोंडा पाटील, नरसगोंडा पाटील, बाबासाहेब चिंचवाडे, कोलकिंग बाळासाहेब पाटील, महावीर पाटील, पाठशाळा शिक्षिका राजमती अक्का व श्रावक - श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.