Sangli Samachar

The Janshakti News

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. मंगेश चिवटे यांच्यामुळे पत्रकारांचे प्रश्न लागणार मार्गी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत विविध पत्रकार संघटना मार्फत शासनास निवेदने देण्यात आली असून, याबाबत आंदोलनेही करण्यात आली आहेत. परंतु आजपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनांची पाने पत्रकारांच्या संघटनांना पुसली आहेत. परंतु पत्रकारांच्या या मागण्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यामुळे.


डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन पत्रकारांच्या मागण्यांचे एक निवेदन सादर केले आणि लक्ष घालण्याचे आवाहन केले. मंगेश छोटे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार असून त्यांना पत्रकारांच्या प्रश्नाविषयी विशेष आस्था आहे. ज्येष्ठ पत्रकारांच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीमार्फत दिला जाणारे सन्मान (पेन्शन) मानधनाच्या प्रश्नासह इतर अनेक मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना साकडे घालू, असे आश्वासन चिवटे यांनी राजा माने यांना दिले.