Sangli Samachar

The Janshakti News

लाडक्या बहिणीच्या चुलीवरील फोडणी महागाई, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांची टीका !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ सप्टेंबर २०२४
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही लोकसभा निवडणुकीतील मतांच्या झालेल्या कडकीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिलांचे आर्थिक मजबुतीकरण करण्याचा खोटा गाजावाजा करीत, शिंदे सरकारने जी लाडकी बहीण योजना लागू केली आहे त्यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी जोरदार टीका केली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेतून महिना पंधराशे रुपये देण्यात येत असताना दुसरीकडे खाद्य तेलाच्या सीमा शुल्कात प्रचंड वाढ करून या लाडक्या बहिणींची चुलीवरील फोडणे महाग करून ठेवली आहे.

देशातील वाढती महागाई महिलांवरील अत्याचार बेरोजगारी भ्रष्टाचार सरकारी योजनांचे खाजगीकरण वाढती गुन्हेगारी देशावर वाढलेले कर्जाचे डोंगर या महत्वपूर्ण बाबीमुळे गत लोकसभा निवडणुकीत मतदारांनी केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारवरील मतदान यंत्रातून आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगून वडेट्टीवर म्हणाले की, आईन सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाच्या सीमा शुल्कात 12. 5% वरून 35. 5% एवढी प्रचंड वाढ केली. त्यामुळे राज्य सरकारचे फसव्या लाडकी बहीण योजनेचे पितळ उघडे पडण्याची खरबरी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी महायुती सरकारवर केली आहे.

एकीकडे लाडके बहीण म्हणून बहिणीच्या खात्यात पैसे जमा करायचे, गाजावाजा करायचा,  तर दुसरीकडे बहिणीच्या घरातच सीमाशुल्काच्या माध्यमातून दरोडा टाकून लुटायचे. अशा दुहेरी भूमिकेमुळे राज्य सरकारच्या फसव्या लाडक्या बहिणी योजनेमुळे राज्यातील महिला वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचेही विजय  वरीटीवर यांनी म्हटले आहे. आणि आता अवघ्या दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत याचा फटका निश्चितपणे शिंदे सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.