| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ सप्टेंबर २०२४
समाज हिताचे काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची गय केली जाणार नाही. कुपवाड आणि टाकळी येथे पत्रकारांना मारहाण केलेल्या प्रकरणातील संशयित आरोपीना अटक करण्यात आली असून चौकशी अंती त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिली. गेल्या दोन दिवसात दोन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची पोलीस अधीक्षक संदीप उभे यांनी गंभीर दखल घेतली असून सकाळची कुपवाड येथील बातमीदार ऋषिकेश माने यांना काल मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने मारहाण केली होती. माने यांनी गणेशोत्सव मिरवणूक कायद्याचे पालन करून झाल्या पाहिजेत, अशा आशयाची बातमी दैनिक सकाळ मधून प्रसिद्ध केली होती. त्याचा राग मला धरून अहिल्यानगर येथील काही तरुणांनी रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास श्री माने यांना काठीने व हातापायांनी जबर मारहाण केली होती यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात मिरज तालुक्यातील टाकळी येथील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात स्पीकर लावला होता, तो बंद करण्यासाठी सांगण्यात गेलेले लोकमतचे पत्रकार तथा पोलीस पाटील संजय माने यांनाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील संख्यांचा तात्काळ ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन त्याला निवेदन दिले तसेच संस्थेचा वर पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार वाढीव गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली.
पोलीस अधीक्षकांना भेटलेल्या शिष्टमंडळात जेष्ठ पत्रकार सुभाष खराडे, प्रकाश कांबळे, शेखर जोशी, सुरेश गुदले, हणमंत मोहिते, जयसिंग कुंभार, शिवराज काटकर, अविनाश कोळी, सचिन मोहिते, विष्णू मोहिते, अजित झळके, धोंडीराम पाटील, शशिकांत शिंदे, गणेश मानस, विकास सूर्यवंशी, सुरेंद्र दुपटे, सोहम देवळेकर, सचिन सुतार, दीपक कांबळे, बलराज पवार, अतुल पाटील, शैलेश पेटकर, अमोल गुरव आदी पत्रकारांचा समावेश होता.