Sangli Samachar

The Janshakti News

बाप्पांच्या कृपेने वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासन विविध लोकप्रिय घोषणा करीत आहे. महिला आणि शेतकरी वर्गांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना खुश करणारा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन वाढ मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने महावितरण आणि महापारेषण या कंपन्यांच्या अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना या वेतन वाढीचा लाभ होणार असून मार्च 2024 पासूनच ही वेतन वाढ लागू होणार आहे. या वेतनवाढी प्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत वेगळी योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही या वेतन वाढीचा लाभ मिळणार आहे.


मुंबई येथील सह्याद्री अतिथी राहत ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील झालेल्या बैठकीस तीनही कंपन्यांच्या प्रतिनिधी बरोबरच सुधीर मुनगट्टीवर, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख, धनंजय मुंडे हे ऑनलाईन उपस्थित होते. या वेतन वाढीचा लाभ वीज कंपन्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे. बाप्पांच्या आगमना बरोबरच वेतनवाढीची आनंददायी बातमी मिळाल्याने, अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबीयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.