yuva MAharashtra भाजपाचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणूकीसाठी व्यवस्थापन समिती जाहीर, अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश !

भाजपाचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणूकीसाठी व्यवस्थापन समिती जाहीर, अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करीत आहे याचाच एक भाग म्हणून भाजपाने एक मोठा निर्णय घेतला असून विधानसभेसाठी व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे हे या समितीचे अध्यक्ष असून नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समितीमध्ये समावेश आहे.

या समितीतील प्रत्येक सदस्याला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. जाहिरात समितीच्या प्रमुखपदी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर असून विशेष संपर्क समितीच्या प्रमुखपदी चंद्रकांत पाटील हे नियुक्त करण्यात आले आहेत. तर महायुतीत समन्वय साधण्यासाठी भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.


या समितीतील प्रत्येक नेता हा कृषी, उद्योग, व्यापार, महिला, तरुण अशा समाजातील महत्त्वाच्या घटकांशी संपर्क साधून विधानसभा निवडणुकीत विजयी विजयी गुढी उभारण्यासाठी सर्वांचा सहभाग घेण्याविषयी प्रयत्न करणार आहे.

पुढील संपूर्ण महिना नितीन गडकरी यांच्यासह प्रत्येक नेता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा जनतेसमोर मांडण्यात येणार असून आगामी पाच वर्षाचे व्हिजनही पोहोचवण्यात येईल.