Sangli Samachar

The Janshakti News

मोदींच्या अमेरिका भेटी दरम्यान भारताला पुन्हा एकदा मिळाला मौल्यवान खजिना परत !


| सांगली समाचार वृत्त |
वॉशिंग्टन - दि. २३ सप्टेंबर २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवारीवरून त्यांना विरोधकाकडून नेहमीच ट्रोल केले जाते. परंतु मोदी यांच्या परदेश भेटी दरम्यान भारताला प्रत्येक वेळी फायदाच झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. या भेटीतही भारताला अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या अनेक मौल्यवान वस्तू परत मिळाल्या आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना चपराक मानली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड, युक्रेन आणि रशिया मनंतर आता अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर तस्करीच्या माध्यमातून अमेरिकेत पोहोचलेल्या, प्राचीन भारतीय संस्कृतीशी संबंधित 297अनोख्या गोष्टी भारताला परत केल्या आहेत. 2014 नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताला जवळपास 640 अत्यंत मौल्यवान आणि प्राचीन वस्तू पुन्हा परत मिळाल्या आहेत. 2021 मध्ये मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळीही तब्बल 157 किमती वस्तू भारताला परत केल्या होत्या.


दरम्यान अमेरिकेने या वस्तू परत केल्यानंतर आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करताना नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे आभार मानले आहेत. 2004 ते 2013 या कालावधीत अमेरिके व्यतिरिक्त युके कडून 16 आणि ऑस्ट्रेलियाकडून अवघी एक कलाकृती परत मिळवण्यात भारताला यश मिळाले होते, हे इथे नोंद घेण्यासारखे आहे.

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा तिसरा कार्यकाल सुरू झाल्यानंतर 2024 मध्ये 46 व्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी व्यतिरिक्त नवी दिल्ली येथे अमेरिका आणि भारतीय यांच्यात कल्चरल प्रॉपर्टी एग्रीमेंट वर सह्या झाल्या होत्या. त्यामुळेच सांस्कृतिक वस्तूंच्या बेकायदेशीर तस्करीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारताची संस्कृती असलेली अनेक मौल्यवान रत्ने, विविध पुरातन मूर्ती त्याचप्रमाणे इतर अनेक किमती वस्तूंची तस्करी होत होती. नव्या झालेल्या करारामुळे तस्करीच्या माध्यमातून परदेशात गेलेल्या वस्तू भारताला पुन्हा परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.