yuva MAharashtra अफजलखानाच्या अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर फिरवण्याच्या धाडसी निर्णयाप्रमाणेच आता तेथे भव्य शिल्प उभारावे - नितीन शिंदे

अफजलखानाच्या अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर फिरवण्याच्या धाडसी निर्णयाप्रमाणेच आता तेथे भव्य शिल्प उभारावे - नितीन शिंदे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ सप्टेंबर २०२४
तत्कालीन महायुतीच्या काळात प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अनधिकृत दर्गा उद्ध्वस्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. आता या ठिकाणी अफजल खान वधाचे भव्य शिल्प उभारावे अशी मागणी श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक तथा हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्या निवेदनात नितीन शिंदे यांनी म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडीचे नेते राजकारण करीत आहेत. याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रतापगड च्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्यासमोर, अफजलखान वधाच्या प्रसंगाचे भव्य शिल्प उभारून, त्याच्या अनावरण प्रसंगी महाआघाडीच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात यावे. जेणेकरून त्यांना यातून महायुतीच्या शिवप्रेमाची प्रचिती येऊ शकेल. या शिल्पाच्या अनावरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी उपस्थित राहतील. असेही नितीन शिंदे यांनी या निवेदनामध्ये नमूद केले आहे.


श्री शिव प्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक नितीन शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच तत्कालीन महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या तथाकथित (दर्ग्याचा) खडग्याचा अनधिकृत भाग उद्ध्वस्त केला होता. निवेदनाची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी अफजलखान वधाचे शिल्प या ठिकाणी उभारल्यास ती एक मोठी उपलब्धी ठरणार आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर हा निर्णय झाला तर त्याचा मोठा फायदा महायुतीला होऊ शकतो अशी प्रतिक्रिया शिवभक्तातून व्यक्त होत आहे.