Sangli Samachar

The Janshakti News

सांगली महापालिकेमार्फत 'टाकाऊ पासून टिकाऊ स्थळ सुशोभीकरण' स्पर्धेचे आयोजन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ सप्टेंबर २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकावतीने घेण्यात येणाऱ्या टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेवरती आधारित स्थळ सुशोभीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांनी केले आहे.

स्पर्धा नोंदणी कालावधी २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत करण्याची आहे. २६ ते २९ सप्टेंबर रोजी स्पर्धा कालावधी असणार आहे. सदरची स्पर्धा ही टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेवरती आधारित आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे नियोजन उप आयुक्त वैभव साबळे यांनी केले आहे. डॉ रवींद्र ताटे अरुण गुजराती पर्यावरण अभियंता, पूनम वर्मा अभियंता, शहर समन्वयक वर्षाराणी चव्हाण यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयन्त केले आहे, 

स्पर्धेचे नियम

सदरची स्पर्धा फक्त मनपा क्षेत्रासाठी असणार आहे.
या मध्ये कोणतीही संस्था, विद्यार्थी समुह ,ग्रुप सहभागी होऊ शकतात .
महानगरपालिकेतर्फे टायर, प्लॅस्टिक बॉटल, बांबु, नायलॉन दोरी, दोन कलर, ब्रश इ. साहित्य आमराई मध्ये २३ ते २५ सप्टेंबर या कालावधी मध्ये सहभागी स्पर्धकांना देण्यात येणार आहे.
वर नमूद साहित्य व्यतिरिक्त लागणारे साहित्य सहभागी स्पर्धक यांनी स्वतः आणावयाचे आहे. दि . २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान आपल्या निश्चित स्थळावरती टाकाऊ वस्तु वापरुन टिकाऊ सुशोभिकरण करावयाचे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनीं नोंदणी करणे आवश्यक आहे. 
स्पर्धेबाबत सर्व निर्णय महानगरपालिकेचा अंतिम राहणार आहे.
स्पर्धकांनी साहित्य नियुक्त केलेल्या विभागाकडून २३ ते २५ सप्टेंबर रोजी घेऊन जाण्याचे आहे.


यासाठी गिरीश पाठक (उद्यान अधीक्षक ) यांच्या कडून साहित्य घेण्याचे आहे. (संपर्क मोबाईल 9822171800 असा आहे.)

२६ ते २९ सप्टेंबर रोजी स्पर्धा कालावधी असणार आहे याची स्पर्धकांनी नोंद घेऊन आपली नोंद वेळेत करावी. ३० ते १ ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धचे परिक्षण होणार आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण हे दि २ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

पारितोषिके

१. प्रथम क्रमांक :- १० हजार, सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र.
२. द्वितीय क्रमांक :- ०७ हजार सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र
३. तृतीय क्रमांक :- ०५ हजार सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र.
४. उत्तेजनार्थ क्रमांक (४ स्पर्धक) प्रत्येकी २ हजार व प्रमाणपत्र.

यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून सदरची स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन सांगली महापालिकेचे आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांनी केले आहे.