Sangli Samachar

The Janshakti News

महास्वच्छता मोहिमेत कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, नागरिक, सामाजिक संस्था, यांचा उस्फुर्त सहभाग; आयुक्तांनी केले कौतुक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ सप्टेंबर २०२४
सांगली महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला. सांगली मिरज रस्ता स्वच्छ करण्याचे नियोजन करून ७ टन कचरा केला संकलित केला आहे. सदर रस्त्यावरील २० ठिकाणे निश्चित करून स्वच्छता करण्यात आली आहे.

या मोहिमेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह
उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, जनसंपर्क तथा मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, डॉ प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सांगावकर , अनिस मुल्ला यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.


 महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण यांनीही या मोहिमेत सहभाग दर्शवत स्वच्छता केली. या मोहिमेसाठी आरोग्य, स्वच्छता बरोबर कार्यालयीन असे १४०० कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये आरोग्य विभाग यांनी चांगले नियोजन केले स्वच्छता निरीक्षक यांनी सर्व कर्मचारी यांच्या मार्फत दिलेल्या भाग स्वच्छ करून घेतला.

डॉ रवींद्र ताटे ,वरिष्ठ स्वछता निरीक्षक युनूस बारगिर , अनिल पाटील , अन्य स्वछता निरीक्षक यांनी चांगले नियोजन आणि काम करून घेतले आहे. सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज मिशन येथील गांधी चौक या प्रमुख मार्गावर ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचे अंदाजे ७ टन सुखा कचरा संकलित झाला आहे.