yuva MAharashtra विशेष न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र एकच खळबळ !

विशेष न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र एकच खळबळ !


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २८ सप्टेंबर २०२४
निवडणूक रोख्यांच्या ( इलेक्टोरल बॉंड) माध्यमातून वसुली केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात बंगळुरूच्या विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने देशभरात खळबळ माजली आहे. निर्मला सीतारामन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे वर्तवण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की बंगळुरु जनाधिकार संघर्ष परिषदेचे श्री. आदर्श अय्यर यांनी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून सितारमन यांनी वसुली केल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. दरम्यान विशेष न्यायालयाने पोलिसांना निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी होणार असून या तारखेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


केंद्र सरकारने 2017 मध्ये निवडणूक रोखे योजना जाहीर केली होती. त्यावर 2018 मध्ये कायदेशीर मोहोर उमटविण्यात आली. यानंतरच राजकीय पक्षांना निवडणूक व त्यांच्या माध्यमातून निधी देण्यात येत होता. यावरून देशभरातून प्रचंड टीकाही झाली होती. पुढे सुप्रीम कोर्टाने हे निवडणूक रोखे योजना रद्द केली. आणि याच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी गोळ्या करण्याचा आरोप निर्मला सीतारामन यांच्यावर या याचिकेद्वारे केला गेला आहे. त्यामुळे पुढे काय ? हा प्रश्न उभा टाकला आहे.