yuva MAharashtra शिवसेना कुणाची ? पुन्हा प्रतीक्षाच पदरात, सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेची सुनावणी ढकलली पुढे !

शिवसेना कुणाची ? पुन्हा प्रतीक्षाच पदरात, सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेची सुनावणी ढकलली पुढे !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ सप्टेंबर २०२४
शिवसेनेची कट्टी करून भाजपाशी गट्टी करणाऱ्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज पुढे ढकलली असो ठाकरे शिवसेनेने सादर केलेली कागदपत्रे तसेच युक्तिवादाने ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आजच्या सुप्रीम कोर्टातील सोनवणे कडे संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते मात्र वेळेअभावी सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने महाराष्ट्राला पुन्हा पुढची तारीख मिळाली आहे.


40 आमदारांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावर विधान तू नार्वेकर यांनी या आमदारांना अपात्र केले नाही त्यांच्या या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ठाकरे गटाने आमदारांची अपत्राता सिद्ध करणारी सर्व कागदपत्रे यापूर्वीच न्यायालयात सादर केलेली आहे शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये त्यामुळे पुन्हा धडधड वाढली आहे. जानेवारीपासून सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख हा सिलसिला सुरू आहे याचिका दाखल होऊन वर्ष होत आले तरी अद्याप याबाबतचा निकाल लागलेला नसल्याने शिवसेना गटाकडून नाराजी व्यक्त होत आहे.