| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ सप्टेंबर २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कडून स्वच्छता हीच सेवा अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता विश्रामबाग चौक येथून महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व उप आयुक्त वैभव साबळे यांच्या नियोजन नुसार सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महापालिका अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, सायकल प्रेमी तसेच सायकलपटू सहभागी झाले होते. मार्केट यार्ड, राममंदिर मार्गे महापालिकेसमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली.
रॅली मध्ये उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त विजया यादव, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, अग्निशमन अधिकारी सुनील माळी, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, सहायक आयुक्त अनिस मुल्ला, सचिन सागवकर, मुख्य लेखाधिकारी शिरीष धनवे, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वाहन विभागाचे विनायक जाधव, जनसंपर्क अधिकारी,मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, पाणी पुरवठा कार्य अधिकारी सुनील पाटील, महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण, यांच्यासह मिरज मॉर्निंग ग्रुपचे सर्व सायकलपटू सहभागी झाले होते.
महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ पहा व्हिडिओ...
यावेळी महापालिका मुख्यालयात स्वच्छ सर्व्हेक्षण माजी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन क्रीडाधिकारी अमजद जेलर आणि स्वच्छ सर्व्हेक्षण विभागाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण, राकेश धायींजे, शिवम शिंदे आदींनी केले.