| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ सप्टेंबर २०२४
सांगली आणि आटपाडी येथील सराफांना सहा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंगाली बाबू अर्थात कारागिराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओडिसा येथे जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. आटपाडी येथील गौतमदास व सौरभदास या बंगाली कारागिराने गेल्या 25 वर्षापासून सरपंच विश्वास संपादन केला होता. आटपाडी सोबत सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकांकडून चूक सोने घेऊन दागिने करण्याचा त्यांचा व्यवसाय होता.
आटपाडी व सांगली येथील सराफाकडून सहा कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन गौतम दास व सौरभ दास या बंधूनी पोबारा केला होता. सांगली व आटपाडी येथील सोनाराने पोलिसात याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार एलसीबीने दास बंधूंच्या शोधासाठी पथके तयार केली होती. त्यातील स्वरूप दास व गौतमदास यांना पश्चिम बंगालमधून अटक केली होती पण मुख्य संशयित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. अखेर एलसीबीच्या एका पथकाने त्याला ओडिसा येथून ताब्यात घेतले असून लवकर त्याला सांगलीत आणण्यात येणार आहे.
सांगली व आटपाडी येथील सोनारांप्रमाणेच या बंगाली कारागिरांकडून आणखी कोणा सराफाची व अन्य कुणाची फसवणूक केली आहे का ? याचा तपासही पोलीस घेत असून, जर कोणाची फसवणूक झाली असेल तर संबंधितांनी पोलीस खात्याकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.