| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १ सप्टेंबर २०२४
मिरजेत गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलीसांनी अटक केली असून त्याच्याकडून वीस हजार रुपयांचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. चेतन कुमार चौगुले (वय 30, रा. आशा टॉकीजवळ मिरज) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक मिरज भागात गस्त गालीत होते या पथकातील हवलदार अमोल ऐवळे यांना पंढरपूर रोडवरील एस एस कॉलेज नजीक एक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला होता. त्यानंतर संशयित तेथील एका बंद टप्पे जवळ येऊन थांबला असता पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे सॅक मध्ये वीस हजार रुपयांचा सापडलेला गांजा जप्त केला आहे. अधिक करता त्याने हा गांजा कोल्हापुरातील आयोग पेरजादे याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.
आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाफ या सणाच्या निमित्ताने पोलीस सतर्क झाले असून जिल्ह्यातील गुन्हेगारावर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषतः नशिले पदार्थांची विक्री करणाऱ्या संस्थेवर अधिक वॉच ठेवण्यात येत आहे. दरम्यान वरील कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे, सोमनाथ पतंगे यांचा समावेश आहे.