yuva MAharashtra 86 वर्षाचा रेकॉर्ड तोडत पुण्यात 24 तासात तब्बल 131 मिमी बरसला धो धो पाऊस !

86 वर्षाचा रेकॉर्ड तोडत पुण्यात 24 तासात तब्बल 131 मिमी बरसला धो धो पाऊस !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २६ सप्टेंबर २०२४
राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात आडवी झाल्याने मोठे नुकसान झाले. काही जिल्ह्यात तर ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. यावेळी पावसाने आपला 86 वर्षांचा इतिहास मोडीत काढत, तब्बल 131 मिमी पावसाचे नोंद विभागाने केली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात कोसळलेल्या या पावसाने बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ पर्यंत मोजल्या गेलेल्या पावसाची नोंद आज सकाळी जाहीर केली. 1938 सालापासून पुण्यात सप्टेंबरमध्ये नोंदवलेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

संपूर्ण राज्यातच अपवादात्मकरित्या जिल्हे वगळता सर्वत्र दे दनादन पाऊस कोसळला मागील पावसाचे विक्रम या पावसाने मोडीत काढले असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा हिरवेगार डोंगराळ लँडस्केप साठी ओळखला जातो नेहमीच येथे माघारी जाणाऱ्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परंतु कालचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस सर्वात आर्थ ऋतू पैकी एक असल्याचे मानले जाते.


दरम्यान पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा हिल स्टेशनने यंदा एक नवा रेकॉर्ड नोंदवला असून या आकडेवारीनुसार बुधवारी शहर आणि आसपासच्या परिसरात हंगामाच्या सुरुवातीपासून तब्बल 5,595 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या एकूण 1000 मिमी पेक्षा जास्त आहे, जो सर्वकालीन उच्चांक मानला जातो. सध्या सुरू असलेल्या पावसाचा हंगाम संपण्यापूर्वी हा आकडा आणखी वाढू शकतो जवळपासचे सर्व जलाशय भरले आहेत त्यामुळे पुढील वर्षाच्या पाणीपुरवठ्याबाबतचे चिंता दूर झाली आहे.