| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ सप्टेंबर २०२४
आज पर्यंत सांगली जिल्हा म्हणजे सुसंस्कृत जिल्हा, अशी ओळख केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात, किंबहुना जगभरात होती. इथल्या अनेक दिग्गजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सांगली जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये या समाजाला तडा देण्याचे घृणास्पद कार्य काही मूठभर तरुणांकडून केले जात आहे. मात्र त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे.
मारामाऱ्या, खून, भ्रष्टाचार असे प्रकार यापूर्वी येथे नव्हते असे नव्हे, परंतु त्याचे व्याप्ती मर्यादित होती. गुन्हेगारी क्षेत्रात कृष्णकृत्ये करणारी अनेक काळी नावे समाजाला ज्ञात होती. पण त्यांच्या वागणुकीला धरबंद होता. परंतु आरोपी ते आरोपीच त्यांच्या कुठल्याही कृष्णकृत्याची बाजू घेता येणार नाही. म्हणूनच कायद्यानेही त्यांना योग्य ती शिक्षा दिल्याचे दिसून येते.
परंतु अलीकडे सांगलीच्या गुन्हेगारी क्षेत्रात जे तरुण वावरत आहेत, त्यांच्या कृष्णकृत्याला कोणताही धरबंद राहिलेला नाही. दुर्दैवाचे बाब म्हणजे यामध्ये अल्पवयीन मुलांचा खुनासारख्या गंभीर प्रकरणात सहभाग वाढतो आहे. हे कशाचे लक्षण म्हणायचे ? गेल्या काही दिवसात घडलेल्या काही खूनांमध्ये अशा अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला आहे.
परंतु आज पर्यंत तिथल्या महिलांच्या शिलाला हात घालण्याचे धाडस भल्याभल्यांना झाले नव्हते. गेल्या काही महिन्यात हे काळे चित्रही समोर येत आहे. संजय नगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अजून ताजी असतानाच, वाळवा तालुक्यातील एका गावातील 75 वर्षीय आजीबाईवर सोमनाथ चंद्रकांत शिंदे (वय 28) या नराधमाने अत्याचार केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
सोमनाथ याचे सदर आजीबाईंच्या घरी येणे जाणे होते. शनिवारी रात्री तिच्या घरातील लोक बाहेर गेल्याने आजीबाई घरात एकट्याच होत्या. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संशयित सोमनाथ हा आजीबाईंच्या घरात शिरला आणि त्याने त्यांच्यावर अत्याचार केला.
यावेळी आजीबाई जोरजोरात ओरडू लागल्याने शेजारील महिलांनी आजीबाईंच्या घराकडे धाव घेतली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. याची याची माहिती मिळताच गावकरी आजीबाईंच्या घराजवळ जमा झाले आणि त्यांनी संशयताला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेनंतर आजीबाईंना प्रथम इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त दाखल करण्यात आले आणि तेथून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सांगली येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. संशयित सोमनाथ शिंदे यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.